प्रश्नोत्तरे

आपल्या मनातील प्रत्येक शंकेचे निरसन

पात्रता, शुल्क, निवड प्रक्रिया व पुरस्कार सोहळ्याबाबत सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न — एकाच पानावर.

सर्वसाधारण माहिती

"अ‍ॅस्पायर फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६" ही राज्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत नोंदणीकृत सेवाभावी संस्था अ‍ॅस्पायर फाउंडेशनतर्फे आयोजित केला जात आहे.

अधिक माहितीसाठी संस्थेच्या हेल्पलाईन क्रमांक 9325005833, 9226646474 वर कॉल अथवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधता येईल.

पुरस्कार प्रदान करताना फोटो सेशन व व्हिडिओ शूटिंग केले जाईल. हे फोटो व व्हिडिओ संबंधित शिक्षकांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवले जातील तसेच अधिकृत वेबसाईट व फेसबुक/इंस्टाग्रामवर शेअर केले जातील.

पात्रता संबंधित

महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त (खाजगी अथवा सरकारी) प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेत किमान १ वर्षाची सेवा पूर्ण असलेले शिक्षक पात्र आहेत. सविस्तर पात्रता अटींसाठी "पात्रता" पान पहा.

नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच राज्य किंवा केंद्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार आधीच प्राप्त शिक्षकांनी कृपया प्रस्ताव दाखल करू नयेत, जेणेकरून अद्याप संधी न मिळालेल्या शिक्षकांना वाव मिळेल. असे शिक्षक फोन/ई-मेलद्वारे संस्थेला मार्गदर्शन देऊ शकतात.

मान्यताप्राप्त खाजगी शाळांतील शिक्षकांकडूनही प्रस्ताव मागवले जातात, मात्र सर्व निकष अशा शिक्षकांना लागू होतीलच असे नाही. निकषांशी साधर्म्य असलेले जे योगदान शैक्षणिक कार्यात दिले असेल त्याची माहिती प्रस्तावात नमूद करावी.

सर्वसाधारणपणे UDISE Code आवश्यक आहे. मात्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) अंतर्गत सुरू असणाऱ्या स्पेशल स्कूल्समधील शिक्षक UDISE Code नसला तरीही प्रस्ताव दाखल करण्यास पात्र आहेत — त्यांना उत्तेजनार्थ विशेष पुरस्कार दिला जातो.

नाही. अ‍ॅस्पायर फाउंडेशन शासनाशी संलग्न नसल्याने पुरावे मुख्याध्यापक, गटशिक्षणअधिकारी अथवा प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करण्याची आवश्यकता नाही. मात्र सादर केलेली माहिती व पुरावे स्वयंसाक्षांकित असावेत आणि चुकीचे अथवा दिशाभूल करणारे नसावेत.

शुल्क संबंधित

नामनिर्देशन शुल्क रु. १,९९९/- आहे.

कोणत्याही UPI अ‍ॅपद्वारे (PhonePe, Google Pay, Paytm, BHIM) QR कोड स्कॅन करून, ऑनलाईन पेमेंट लिंकद्वारे डेबिट/क्रेडिट कार्ड व नेटबँकिंगने, किंवा थेट बँक ट्रान्स्फरद्वारे शुल्क भरता येते.

पुरस्कार सोहळ्यासाठी शिक्षकांना स्वखर्चाने पुरस्कारस्थळी उपस्थित राहावे लागेल. सोहळ्याच्या दिवशी उपस्थित पुरस्कारार्थी व सोबत आलेल्या सदस्यांच्या चहापानाची व्यवस्था अ‍ॅस्पायर फाउंडेशनमार्फत केली जाईल.

निवड प्रक्रिया

प्रस्ताव www.shikshakpuraskar.com या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने दाखल करावा. ऑनलाईन प्रस्ताव दाखल केल्यास स्वतंत्र ऑफलाईन अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.

नामनिर्देशन शुल्क भरण्याची अंतिम तारीख ०५ ऑक्टोबर २०२६ आहे, तर ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम तारीख ०५ ऑक्टोबर २०२६ आहे.

तज्ज्ञ समिती सर्व प्रस्तावांची पारदर्शक पद्धतीने छाननी करते. एकूण २०० गुणांचे मूल्यमापन केले जाते — ९० गुण विहित निकषांवर, ३० गुण विशेष अतिरिक्त योगदानासाठी व ८० गुण ऑनलाईन प्रोफाइल मतदानाच्या पर्सेंटाइल फॉर्म्युलावर आधारित असतात.

प्रस्ताव दाखल केल्यानंतर प्रत्येक शिक्षकाचे एक ऑनलाईन प्रोफाइल तयार केले जाते व त्याची लिंक शिक्षकास पाठवली जाते. ही लिंक फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करता येते. या प्रोफाइलवर मिळालेल्या मतांच्या आधारे पर्सेंटाइल फॉर्म्युलानुसार ८० गुणांचे मूल्यमापन केले जाते.

प्राथमिक स्तरावर निवड झालेल्या शिक्षकांनी सादर केलेली माहिती व पुरावे संबंधित शाळेशी संपर्क साधून पडताळले जातात. त्यानंतरच अंतिम निवड यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते.

अंतिम निवड यादी अधिकृत वेबसाईटवर, सोशल मीडिया हँडलवर व वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केली जाईल. तसेच प्रस्ताव दाखल करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला अंतिम यादी ई-मेल व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवली जाईल.

प्राथमिक निवड झालेल्या शिक्षकांची माहिती व पुरावे त्या शिक्षकाच्या कार्यरत शाळेशी संपर्क करून पडताळले जातात. यानंतरच अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाते.

प्रस्तावांची पडताळणी, छाननी व निकषांनुसार मूल्यमापन करूनच पुरस्कार यादी जाहीर केली जाते. अंतिम यादी निवडीचा पूर्ण अधिकार समितीकडे राहील व निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.

पुरस्कार सोहळा

पुरस्कार सोहळा रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी नांदूर नाका, नाशिक येथील भव्य बँक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

अंतिम निवड झालेल्या पुरस्कारार्थींना सोहळ्याच्या तारखेच्या १० दिवस आधी फोन, ई-मेल व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे निमंत्रण पत्र पाठवले जाईल.

राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जास्तीत जास्त ५ सदस्यांना, जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक जास्तीत जास्त ३ सदस्यांना, तर तालुका व उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त शिक्षक जास्तीत जास्त १ सदस्याला सोबत आणू शकतात. उर्वरित सर्व सहभागी शिक्षक १ कुटुंबीय सदस्यास आमंत्रित करू शकतात.

आपल्या शोधाशी जुळणारा प्रश्न सापडला नाही. कृपया वेगळा शब्द वापरून पहा किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा.

आणखी प्रश्न आहेत?

आमची टीम मदतीसाठी सज्ज आहे

आपल्या कार्याचा सन्मान होण्याची वेळ आली आहे

राज्यातील शेकडो शिक्षकांप्रमाणे आपणही आपला नामनिर्देशन प्रस्ताव आजच दाखल करा.

नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करा
संपर्क

आमच्याशी संपर्क साधा

हेल्पलाईन
9325005833, 9226646474
व्हॉट्सअ‍ॅप
9325005833
कार्यक्रम स्थळ
बँक्वेट हॉल, नांदूर नाका, नाशिक
वेबसाईट
www.shikshakpuraskar.com

आपला प्रश्न पाठवा