प्रस्तावासाठी आवश्यक अटी
प्रस्ताव दाखल करण्यासाठी संपूर्ण पात्रता अटी
खालील सर्व १५ अटी माहितीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे — प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी प्रत्येक अट काळजीपूर्वक वाचावी.
१
महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त (खाजगी अथवा सरकारी) शाळेत (प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक) शिक्षक म्हणून सेवेत असावा.
२
मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या कोणत्याही सरकारी, निमसरकारी, खाजगी, स्थानिक स्वराज संस्था यांच्या शाळांमध्ये सेवेत असलेले शिक्षक प्रस्ताव दाखल करण्यासाठी पात्र आहेत.
३
स्टेट बोर्ड, सी.बी.एस.ई. बोर्ड, आय.सी.एस.ई. बोर्ड तसेच आय.जी.सी.एस.ई. बोर्डाच्या शाळांतील शिक्षक प्रस्ताव दाखल करण्यास पात्र आहेत.
४
शिक्षक एकूण सेवा किमान १ वर्षे आवश्यक.
५
शिक्षक निर्व्यसनी असावेत — अंतिम निवड यादी जाहीर करताना तज्ज्ञ समितीमार्फत शिक्षक ज्या शाळेत कार्यरत आहे त्या शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क करून याची खातरजमा केली जाईल.
६
शिक्षकांनी शिकवणीत सहभागी होऊ नये.
७
शाळेला UDISE Code असणे आवश्यक. मान्यता नसलेल्या शाळा, खाजगी शिकवणी वर्गातील शिक्षक, खाजगी ऑनलाईन पोर्टल/वेबसाईटवर अध्यापन करणाऱ्या व्यक्ती, पूर्व प्राथमिक शाळा शिक्षक प्रस्ताव दाखल करण्यास पात्र नाहीत.
८
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) अंतर्गत सुरू असणाऱ्या स्पेशल स्कूल्समध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणारे शिक्षक शाळेला UDISE Code नसेल तरीही प्रस्ताव दाखल करण्यास पात्र राहतील. त्यांच्यासाठी नियमित शिक्षकांव्यतिरिक्त उत्तेजनार्थ विशेष पुरस्कार प्रदान केले जातील.
९
शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे स्वयंसाक्षांकित करणे आवश्यक आहे. अॅस्पायर फाउंडेशन ही संस्था शासनाशी संलग्न नसल्याने सदर पुरावे शाळेचे मुख्याध्यापक, गटशिक्षणअधिकारी अथवा प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करण्याची आवश्यकता नाही, परंतु दिलेली माहिती व पुरावे चुकीचे अथवा दिशाभूल करणारे नसावेत.
१०
प्राथमिक स्वरूपात निवड झालेल्या सर्व आदर्श शिक्षकांचे प्रस्तावातील माहिती व पुरावे, शिक्षक ज्या शाळांत कार्यरत असतील त्या शाळांशी संपर्क करून खातरजमा करून घेतली जाईल; त्यानंतरच सदर शिक्षकांची यादी वेबसाईट, सोशल मीडिया हँडल व वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येईल.
११
प्रस्ताव दाखल करणाऱ्या शिक्षकांची कसल्याही प्रकारची विभागीय चौकशी सुरू नसावी.
१२
कोणत्याही कारणास्तव निलंबित असलेले शिक्षक प्रस्ताव दाखल करण्यास पात्र नाहीत.
१३
शिक्षकांनी प्रस्तावात दाखल केलेल्या कार्याचे मूल्यमापन तज्ज्ञ समितीकडून गुणांकनाद्वारे केले जाईल.
१४
प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले शिक्षक प्रस्ताव दाखल करण्यास पात्र नाहीत.
१५
नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच राज्य अथवा केंद्र शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी कृपया नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करू नयेत. सदर शिक्षकांनी कृपया फोन व ईमेलद्वारे अॅस्पायर फाउंडेशनला संपर्क करून आपले बहुमूल्य मार्गदर्शन करावे.