अ‍ॅस्पायर फाउंडेशन आयोजित

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६

आजचे विद्यार्थी घडवणाऱ्या, राज्यभरातील गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांच्या निष्ठापूर्वक कार्याचा गौरव. राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर सन्मान — शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, ट्रॉफी व विशेष भेटवस्तूंसह.

नामनिर्देशन शुल्क भरण्याची अंतिम तारीख — ०५ सप्टेंबर २०२६
00दिवस
00तास
00मिनिटे
00सेकंद
पुरस्कार ठळक वैशिष्ट्ये
१००राज्य आदर्श शिक्षक
३६०जिल्हा आदर्श शिक्षक
प्रत्येक तालुकातालुका आदर्श शिक्षक
१८ ऑक्टो. २०२६पुरस्कार सोहळा, नाशिक
पुरस्काराबद्दल

शिक्षकांच्या शांत, निष्ठावान कार्याला हक्काचा सन्मान

शिक्षण हा समाजाच्या विकासाचा मजबूत पाया आहे. शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे महत्त्वाचे काम करत असतात — संस्कार, ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन देऊन ते देशाचे आदर्श नागरिक घडवतात.

इतर व्यवसायांत निवृत्तीनंतर व्यक्ती "माजी" ठरतात, पण शिक्षक आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या मनात "माझे शिक्षक" म्हणूनच राहतात. अनेक गुणवंत व मेहनती शिक्षक मात्र पुरस्कारांपासून वंचित राहतात व त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचत नाही — याच पोकळीसाठी अ‍ॅस्पायर फाउंडेशनने हा उपक्रम सुरू केला आहे.

  • राज्यातील १०० शिक्षकांची "राज्य आदर्श शिक्षक" म्हणून निवड
  • प्रत्येक जिल्ह्यातील १० असे एकूण ३६० शिक्षकांची "जिल्हा आदर्श शिक्षक" म्हणून निवड
  • प्रत्येक तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षकाला "तालुका आदर्श शिक्षक" पुरस्कार
  • इतर सर्व सहभागी शिक्षकांना मंचावर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार
  • निवडक शाळांना डिजिटल साहित्य देणगी स्वरूपात
शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना

"माझे शिक्षक" — निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांच्या मनात कायम राहणारी ओळख.

श्री. बबनराव मधुकर वाघ, अध्यक्ष, अ‍ॅस्पायर फाउंडेशन
श्री. बबनराव मधुकर वाघ
संस्थापक - अध्यक्ष, अ‍ॅस्पायर फाउंडेशन
अ‍ॅस्पायर फाउंडेशन विषयी

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत नोंदणीकृत सेवाभावी संस्था

अ‍ॅस्पायर फाउंडेशन ही राज्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक नोंदणीकृत सेवाभावी संस्था (एन.जी.ओ.) आहे. संस्थेला ISO 9001:2015 मानांकन प्राप्त आहे, तसेच भारत सरकारच्या नीती आयोगाचीही मान्यता संस्थेला प्राप्त आहे. संबंधित सर्व कागदपत्रे अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

ISO 9001:2015 मानांकित
नीती आयोग मान्यताप्राप्त
पारदर्शक निवड प्रक्रिया
अधिकृत कागदपत्रे पहा
सहभागी का व्हावे

आपल्या कार्याला मिळेल हक्काचे व्यासपीठ

कार्याची ओळख समाजापर्यंत

आपल्या उपक्रमशील कार्याची माहिती वेबसाईट, सोशल मीडिया व वर्तमानपत्रातून समाजापर्यंत पोहोचते.

पारदर्शक तज्ज्ञ समिती

सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, राष्ट्रीय/राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांची समिती छाननी करते.

राज्य, जिल्हा व तालुका स्तर

प्रत्येक स्तरावरील गुणवंत शिक्षकाला संधी — तळागाळातील शिक्षकही वंचित राहणार नाही.

सर्व सहभागींचा सन्मान

निवड न झालेल्या सर्व सहभागी शिक्षकांनाही सोहळ्यात मंचावर शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येते.

पुरस्कार स्तर

चार स्तरांवर होणार शिक्षकांचा सन्मान

राज्यस्तर

राज्य आदर्श शिक्षक

संपूर्ण राज्यातून १०० शिक्षकांची निवड
शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, ट्रॉफी व लॅपटॉप

१०० शिक्षक
जिल्हास्तर

जिल्हा आदर्श शिक्षक

प्रत्येक जिल्ह्यातून दहा शिक्षकाची निवड
शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, ट्रॉफी व टॅब

३६० शिक्षक
तालुकास्तर

तालुका आदर्श शिक्षक

प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड
शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व ट्रॉफी

प्रत्येक तालुका
महत्वाचे

सर्व सहभागी शिक्षक

नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करणाऱ्या इतर सर्व सहभागी शिक्षकांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मान

सहभाग

नामनिर्देशन प्रस्ताव दाखल केलेल्या उर्वरित सर्व सहभागी शिक्षकांनाही पुरस्कार सोहळ्यात मंचावर मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.

पुरस्काराचे स्वरूप

प्रत्येक स्तरावर सन्मानाचे विशेष स्वरूप

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार
  • शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व ट्रॉफी
  • नावाजलेल्या कंपनीचा हाय कॉन्फिगरेशन लॅपटॉप भेट
  • मान्यवरांच्या हस्ते सन्मान
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार
  • शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व ट्रॉफी
  • नावाजलेल्या कंपनीचा हाय कॉन्फिगरेशन टॅब भेट
  • मान्यवरांच्या हस्ते सन्मान
तालुका व विशेष पुरस्कार
  • शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व ट्रॉफी
  • मान्यवरांच्या हस्ते सन्मान
  • उत्तेजनार्थ विशेष पुरस्कार (पात्र शाळांसाठी)
निवडक शाळांना एल.ई.डी. स्क्रीन देणगी

तज्ञ समितीमार्फत निवडक शाळांना पुरस्कार सोहळ्याच्या मंचावरून एल.ई.डी. स्क्रीन भेट म्हणून दिली जाईल.

सर्व सहभागी शिक्षकांचा सन्मान

उर्वरित सर्व सहभागी शिक्षकांना सोहळ्यात आमंत्रित करून शाल, श्रीफळ व सन्मानपत्र दिले जाईल.

मूल्यमापन पद्धत

एकूण २०० गुणांचे पारदर्शक मूल्यमापन

शिक्षकांच्या कार्याचे मूल्यमापन तीन भागांत केले जाते — यामुळे प्रक्रिया वस्तुनिष्ठ व पारदर्शक राहते.

९० गुणनिकषानुसार मूल्यमापन
३० गुणविशेष अतिरिक्त योगदान
८० गुणऑनलाईन प्रोफाइल मतदान (पर्सेंटाइल)

९०

शैक्षणिक अर्हता, अध्ययन निष्पत्ती, संशोधन, सामाजिक कार्य, ग्रंथलेखन, ऑनलाईन उपक्रम सहभाग इ. २० हून अधिक निकषांवर आधारित गुणदान.

३०

सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण संवेदनशीलता, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापर व शैक्षणिक दृष्टिकोन यासाठी राखीव गुण.

८०

ऑनलाईन प्रोफाइल लिंकवर प्राप्त मतांच्या पर्सेंटाइल फॉर्म्युलानुसार गुणदान.

निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. प्राथमिक निवड झालेल्या शिक्षकांची माहिती संबंधित शाळेशी संपर्क करून पडताळली जाईल, त्यानंतरच अंतिम यादी प्रसिद्ध होईल.

निवड प्रक्रिया

तज्ज्ञ समितीमार्फत पारदर्शक छाननी

आलेल्या सर्व प्रस्तावांची छाननी व शिक्षकांची निवड पारदर्शक पद्धतीने केली जाते. सर्व प्रस्तावांची डिजिटल नोंद एक वर्षासाठी जतन करून ठेवली जाते.

नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच राज्य किंवा केंद्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी कृपया या पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करू नयेत — जेणेकरून अद्याप संधी न मिळालेल्या गुणवंत शिक्षकांना वाव मिळेल. असे शिक्षक दूरध्वनी किंवा ई-मेलद्वारे संस्थेला मार्गदर्शन करू शकतात.

सदस्यसंख्यापदनाम
सेवानिवृत्त शिक्षणाधिकारीएकअध्यक्ष
राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक / मुख्याध्यापकचारसदस्य
शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीपाचसदस्य
अ‍ॅस्पायर फाउंडेशन कर्मचारीपंधरातांत्रिक सहाय्यक
पात्रता

प्रस्ताव दाखल करण्यासाठी आवश्यक अटी

पात्र शिक्षक
  • महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त (खाजगी/सरकारी) शाळेत प्राथमिक, माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक स्तरावर कार्यरत शिक्षक
  • मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या शासकीय, निमशासकीय, खाजगी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील शिक्षक
  • स्टेट बोर्ड, सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई. तसेच आय.जी.सी.एस.ई. बोर्डाच्या शाळांतील शिक्षक
  • किमान १ वर्ष एकूण सेवा पूर्ण असलेले शिक्षक
  • शिक्षण सेवक, सहा. शिक्षक, शिक्षक, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, प्राचार्य
  • UDISE Code असलेल्या शाळेतील शिक्षक
  • NIOS अंतर्गत स्पेशल स्कूल्समधील शिक्षक (UDISE Code नसला तरीही, उत्तेजनार्थ विशेष पुरस्कारासाठी)
अपात्र / प्रस्ताव दाखल न करणारे
  • मान्यता नसलेल्या शाळांतील शिक्षक
  • खाजगी शिकवणी वर्गातील शिक्षक व शिकवणीत सहभागी शिक्षक
  • खाजगी ऑनलाईन पोर्टल/वेबसाईटवर अध्यापन करणाऱ्या व्यक्ती
  • पूर्व प्राथमिक शाळा शिक्षक
  • विभागीय चौकशी सुरू असलेले शिक्षक
  • कोणत्याही कारणास्तव निलंबित शिक्षक
  • प्रतिनियुक्तीवर कार्यरत शिक्षक
  • नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, राज्य अथवा केंद्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार आधीच प्राप्त शिक्षक

शिक्षकांनी सादर केलेले पुरावे स्वयंसाक्षांकित करणे आवश्यक आहे. अ‍ॅस्पायर फाउंडेशन ही संस्था शासनाशी संलग्न नसल्याने पुरावे मुख्याध्यापक/गटशिक्षणअधिकारी/प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करण्याची आवश्यकता नाही — परंतु दिलेली माहिती व पुरावे चुकीचे अथवा दिशाभूल करणारे नसावेत.

नामनिर्देशन प्रक्रिया

सर्वसाधारण वेळापत्रक

खालील वेळापत्रकात अनपेक्षित बदल झाल्यास सर्व नामनिर्देशित शिक्षकांना ई-मेल व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सूचित केले जाईल.

जाहिरात प्रसिद्धी
०१/०८/२०२६
नामनिर्देशन शुल्क भरणा अंतिम तारीख
०५/०९/२०२६
ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करणे
१५/०९/२०२६
तज्ज्ञ समितीकडून प्रस्ताव पडताळणी
२५/०९/२०२६
तात्पुरती निवड यादी
३०/०९/२०२६
अंतिम निवड यादी वेबसाईटवर प्रसिद्ध
०५/१०/२०२६
पुरस्कार वितरण समारंभ
रवि, १८/१०/२०२६ — नांदूर नाका, नाशिक

नामनिर्देशन शुल्क

₹ १,९९९ / प्रति शिक्षक
  • नामनिर्देशन शुल्क
  • कोणत्याही UPI अ‍ॅपद्वारे (PhonePe, Google Pay, Paytm, BHIM) QR कोड स्कॅन करून भरता येते.
  • डेबिट/क्रेडिट कार्ड व नेटबँकिंगद्वारे ऑनलाईन पेमेंट लिंकची सुविधा उपलब्ध.
बँक ट्रान्स्फर तपशील

खाते नाव: Aspire Foundation

खाते क्रमांक: 0610102000017329

IFSC कोड: IBKL0000103

शाखा: नाशिक मेन ब्रांच

ऑनलाईन नामनिर्देशन प्रस्ताव

खालील फॉर्म भरून आपला प्राथमिक तपशील नोंदवा. आमचे समन्वयक आपल्याशी पुढील प्रक्रियेसाठी संपर्क साधतील.

आवश्यक कागदपत्रे

ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव दाखल करत असतांना काय काय आपलोड करावे लागेल

शैक्षणिक कार्याचे फोटो व्हिडिओ

आपण करत असलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे फोटो आणि व्हिडिओ

पुरस्कार / प्रशस्तीपत्रके

विद्यार्थी व शिक्षकांना प्राप्त पुरस्कारांचे फोटो

प्रकाशित लेख / संशोधन

वृत्तपत्र/नियतकालिकातील लेख अथवा संशोधनपर निबंध

सेवा अभिलेख

शाळानिहाय सेवा कालावधीचा तपशील

टीप: प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने दाखल करत असल्यास स्वतंत्र ऑफलाईन अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.

संपूर्ण माहितीपत्रक डाउनलोड करा

पुरस्काराचे निकष, गुणदान पद्धत व विहित नमुना अर्जासह संपूर्ण माहिती PDF स्वरूपात मिळवा.

माहितीपत्रक डाउनलोड करा
प्रश्नोत्तरे

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

"अ‍ॅस्पायर फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६" ही राज्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत नोंदणीकृत सेवाभावी संस्था अ‍ॅस्पायर फाउंडेशनतर्फे आयोजित केला जात आहे.

महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त (खाजगी अथवा सरकारी) प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेत किमान १ वर्षाची सेवा पूर्ण असलेले शिक्षक पात्र आहेत. सविस्तर पात्रता अटींसाठी वरील "पात्रता" विभाग पहा.

नामनिर्देशन शुल्क रु. १,९९९/- आहे.

कोणत्याही UPI अ‍ॅपद्वारे (PhonePe, Google Pay, Paytm, BHIM) QR कोड स्कॅन करून, ऑनलाईन पेमेंट लिंकद्वारे डेबिट/क्रेडिट कार्ड व नेटबँकिंगने, किंवा थेट बँक ट्रान्स्फरद्वारे शुल्क भरता येते.

प्रस्ताव www.shikshakpuraskar.com या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने दाखल करावा. ऑनलाईन प्रस्ताव दाखल केल्यास स्वतंत्र ऑफलाईन अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.

नामनिर्देशन शुल्क भरण्याची अंतिम तारीख ०५ संपटेबर २०२६ आहे, तर ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२६ आहे.

नाही. अ‍ॅस्पायर फाउंडेशन शासनाशी संलग्न नसल्याने पुरावे मुख्याध्यापक, गटशिक्षणअधिकारी अथवा प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करण्याची आवश्यकता नाही. मात्र सादर केलेली माहिती व पुरावे स्वयंसाक्षांकित असावेत आणि चुकीचे अथवा दिशाभूल करणारे नसावेत.

तज्ज्ञ समिती सर्व प्रस्तावांची पारदर्शक पद्धतीने छाननी करते. एकूण २०० गुणांचे मूल्यमापन केले जाते — ९० गुण विहित निकषांवर, ३० गुण विशेष अतिरिक्त योगदानासाठी व ८० गुण ऑनलाईन प्रोफाइल मतदानाच्या पर्सेंटाइल फॉर्म्युलावर आधारित असतात.

प्रस्ताव दाखल केल्यानंतर प्रत्येक शिक्षकाचे एक ऑनलाईन प्रोफाइल तयार केले जाते व त्याची लिंक शिक्षकास पाठवली जाते. ही लिंक फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करता येते. या प्रोफाइलवर मिळालेल्या मतांच्या आधारे पर्सेंटाइल फॉर्म्युलानुसार ८० गुणांचे मूल्यमापन केले जाते.

प्राथमिक स्तरावर निवड झालेल्या शिक्षकांनी सादर केलेली माहिती व पुरावे संबंधित शाळेशी संपर्क साधून पडताळले जातात. त्यानंतरच अंतिम निवड यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते.

अंतिम निवड यादी अधिकृत वेबसाईटवर, सोशल मीडिया हँडलवर व वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केली जाईल. तसेच प्रस्ताव दाखल करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला अंतिम यादी ई-मेल व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवली जाईल.

पुरस्कार सोहळा रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी नांदूर नाका, नाशिक येथील भव्य बँक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

अंतिम निवड झालेल्या पुरस्कारार्थींना सोहळ्याच्या तारखेच्या १० दिवस आधी फोन, ई-मेल व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे निमंत्रण पत्र पाठवले जाईल.

राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जास्तीत जास्त ५ सदस्यांना, जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक जास्तीत जास्त ३ सदस्यांना, तर तालुका व उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त शिक्षक जास्तीत जास्त १ सदस्याला सोबत आणू शकतात. उर्वरित सर्व सहभागी शिक्षक १ कुटुंबीय सदस्यास आमंत्रित करू शकतात.

पुरस्कार सोहळ्यासाठी शिक्षकांना स्वखर्चाने पुरस्कारस्थळी उपस्थित राहावे लागेल. सोहळ्याच्या दिवशी उपस्थित पुरस्कारार्थी व सोबत आलेल्या सदस्यांच्या चहापानाची व्यवस्था अ‍ॅस्पायर फाउंडेशनमार्फत केली जाईल.

नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच राज्य किंवा केंद्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार आधीच प्राप्त शिक्षकांनी कृपया प्रस्ताव दाखल करू नयेत, जेणेकरून अद्याप संधी न मिळालेल्या शिक्षकांना वाव मिळेल. असे शिक्षक फोन/ई-मेलद्वारे संस्थेला मार्गदर्शन देऊ शकतात.

मान्यताप्राप्त खाजगी शाळांतील शिक्षकांकडूनही प्रस्ताव मागवले जातात, मात्र सर्व निकष अशा शिक्षकांना लागू होतीलच असे नाही. निकषांशी साधर्म्य असलेले जे योगदान शैक्षणिक कार्यात दिले असेल त्याची माहिती प्रस्तावात नमूद करावी.

सर्वसाधारणपणे UDISE Code आवश्यक आहे. मात्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) अंतर्गत सुरू असणाऱ्या स्पेशल स्कूल्समधील शिक्षक UDISE Code नसला तरीही प्रस्ताव दाखल करण्यास पात्र आहेत — त्यांना उत्तेजनार्थ विशेष पुरस्कार दिला जातो.

प्राथमिक निवड झालेल्या शिक्षकांची माहिती व पुरावे त्या शिक्षकाच्या कार्यरत शाळेशी संपर्क करून पडताळले जातात. यानंतरच अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाते.

प्रस्तावांची पडताळणी, छाननी व निकषांनुसार मूल्यमापन करूनच पुरस्कार यादी जाहीर केली जाते. अंतिम यादी निवडीचा पूर्ण अधिकार समितीकडे राहील व निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.

अधिक माहितीसाठी संस्थेचे हेल्पलाईन क्रमांक 9325005833, 9226646474, 7058397976 वर कॉल अथवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधता येईल.

पुरस्कार प्रदान करताना फोटो सेशन व व्हिडिओ शूटिंग केले जाईल. हे फोटो व व्हिडिओ संबंधित शिक्षकांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवले जातील तसेच अधिकृत वेबसाईट व फेसबुक/इंस्टाग्रामवर शेअर केले जातील.

आपल्या कार्याचा सन्मान होण्याची वेळ आली आहे

राज्यातील शेकडो शिक्षकांप्रमाणे आपणही आपले नामनिर्देशन प्रस्ताव आजच दाखल करा.

नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करा
संपर्क

आमच्याशी संपर्क साधा

हेल्पलाईन
9325005833, 9226646474, 7058397976
व्हॉट्सअ‍ॅप
9325005833
कार्यक्रम स्थळ
बँक्वेट हॉल, नांदूर नाका, नाशिक
वेबसाईट
www.shikshakpuraskar.com

आपला प्रश्न पाठवा