पुरस्कार स्तर व स्वरूप

राज्य, जिल्हा, तालुका व विशेष स्तरावर शिक्षकांचा गौरव

प्रत्येक स्तरावरील भेटवस्तू, ट्रॉफी व गौरवाचे स्वरूप — तसेच निवडीसाठी वापरली जाणारी २०० गुणांची मूल्यमापन पद्धत.

पुरस्कार स्तर

चार स्तरांवर होणार शिक्षकांचा सन्मान

अ‍ॅस्पायर फाउंडेशनची तज्ज्ञ समिती सर्व प्रस्तावांची तपासणी करून विविध निकषांच्या आधारे राज्य, जिल्हा, तालुका व विशेष स्तरावर शिक्षकांची निवड करेल.

राज्यस्तर

राज्य आदर्श शिक्षक

संपूर्ण राज्यातून १०० शिक्षकांची निवड अ‍ॅस्पायर फाउंडेशन राज्य आदर्श शिक्षक म्हणून करण्यात येईल

१०० शिक्षक
जिल्हास्तर

जिल्हा आदर्श शिक्षक

प्रत्येक जिल्ह्यातून १० शिक्षक असे एकूण ३६० शिक्षकांची निवड अ‍ॅस्पायर फाउंडेशन जिल्हा आदर्श शिक्षक म्हणून करण्यात येईल

३६० शिक्षक
तालुकास्तर

तालुका आदर्श शिक्षक

१०० राज्यस्तरीय व ३६० जिल्हास्तरीय निवडीनंतर उरलेल्या प्रस्तावांतून प्रत्येक तालुक्यातून एकाची निवड

प्रत्येक तालुका
विशेष

सर्व सहभागी शिक्षक

ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करणाऱ्या परंतु राज्य, जिल्हा व तालुका साठी निवड न झालेल्या इतर सर्व सहभागी शिक्षकांचाही सन्मान

सर्व सहभागी

राज्यातून १०० राज्यस्तरीय व राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून १० असे ३६० जिल्हास्तरीय — असे एकूण ४६० शिक्षकांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उरलेल्या प्रस्तावांची तालुका निहाय छाननी करून प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड "अ‍ॅस्पायर फाउंडेशन तालुका आदर्श शिक्षक" म्हणून करण्यात येईल, तसेच ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करणाऱ्या उर्वरित सर्व सहभागी शिक्षकांनाही पुरस्कार सोहळ्याच्या दिवशी मंचावर मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. जेणेकरून तळागाळातील कोणताही गुणवत्तावान, होतकरू व उपक्रमशील शिक्षक पुरस्कारापासून वंचित राहू नये.

नामनिर्देशन प्रस्ताव दाखल केलेल्या उर्वरित सर्व सहभागी शिक्षकांनाही पुरस्कार सोहळ्यात मंचावर शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.

पुरस्काराचे स्वरूप

प्रत्येक स्तरावर सन्मानाचे विशेष स्वरूप

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार
  • शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व ट्रॉफी
  • नावाजलेल्या कंपनीचा हाय कॉन्फिगरेशन लॅपटॉप भेट
  • मान्यवरांच्या हस्ते सन्मान
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार
  • शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व ट्रॉफी
  • नावाजलेल्या कंपनीचा हाय कॉन्फिगरेशन टॅब भेट
  • मान्यवरांच्या हस्ते सन्मान
तालुका व विशेष पुरस्कार
  • शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व ट्रॉफी
  • मान्यवरांच्या हस्ते सन्मान
  • उत्तेजनार्थ विशेष पुरस्कार (पात्र शाळांसाठी)
निवडक शाळांना एल.ई.डी. स्क्रीन देणगी

शासनाचे व स्वयंसेवी संस्थांचे प्रयत्न सुरू असूनही बदलत्या तंत्रज्ञानाचा फायदा राज्यातील प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला अजूनही मिळालेला नाही. प्रस्ताव दाखल करणाऱ्या शिक्षकांसोबतच्या संवादातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तज्ज्ञ समितीमार्फत निवडक शाळांना पुरस्कार सोहळ्याच्या मंचावरून एल.ई.डी. स्क्रीन भेट म्हणून दिली जाईल.

सर्व सहभागी शिक्षकांचा सन्मान

नामनिर्देशन प्रस्ताव दाखल केलेल्या उर्वरित सर्व सहभागी शिक्षकांना पुरस्कार सोहळ्याला आमंत्रित करून मंचावर मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.

मूल्यमापन पद्धत

एकूण २०० गुणांचे पारदर्शक मूल्यमापन

शिक्षकांच्या कार्याचे मूल्यमापन तीन भागांत केले जाते — यामुळे प्रक्रिया वस्तुनिष्ठ व पारदर्शक राहते.

९० गुणनिकषानुसार मूल्यमापन
३० गुणविशेष अतिरिक्त योगदान
८० गुणऑनलाईन प्रोफाइल मतदान (पर्सेंटाइल)
निकषटिप्पणीकमाल गुण
आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा पुढचा टप्पाअतिरिक्त शैक्षणिक अर्हता — स्वयंसाक्षांकित प्रति सादर करणे आवश्यक
विद्यार्थ्यांची चाचणी / अध्ययन निष्पत्तीअभ्यासक्रम पूर्ण शिकवल्यानंतर होणारा अपेक्षित वर्तन बदल
शैक्षणिक संशोधनपर निबंध / प्रबंधयास प्राप्त पुरस्कार व सादरीकरण
वृत्तपत्र अथवा नियतकालिकात प्रकाशित लेखवैचारिक किंवा विश्लेषणात्मक
विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील प्राप्त पुरस्कारकला, क्रीडा, संगीत, नृत्य, भाषा, गणित, सामाजिक शास्त्र, स्काऊट गाईड, चित्रकला, वकृत्व इ.
सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यआपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय कार्य — शासन/स्वयंसेवी संस्थेकडून प्राप्त पुरस्कार
शाळेच्या उन्नतीसाठी समाजाकडून मिळवलेले योगदानडिजिटल साहित्य इ.
ग्रंथलेखन — शैक्षणिक व सामाजिक विषयावरचे पुस्तकप्रत्येक ग्रंथास एक गुण, जास्तीत जास्त ५ गुण
प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून कामविविध स्तरावर
प्रज्ञाशोध परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाणराज्य व राष्ट्रीय शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध इ. परीक्षा
नवप्रकल्पाद्वारे शैक्षणिक क्षेत्राला दिशा देणारे कार्यज्ञानरचनावाद, डिजिटल स्कूल, साहित्यनिर्मिती, वाचनप्रेरणा, नवोपक्रम
विविध ऑनलाईन उपक्रमात सहभागस्वाध्याय, अभ्यासमाला इ.
ऑनलाईन पोर्टल/ॲप/वेबसाईटवर स्वतः साहित्यनिर्मितीब्लॉग, वेबसाईट, युट्युब इ.
शैक्षणिक स्पर्धांतील विद्यार्थ्यांचा सहभागविज्ञान प्रदर्शन, कला, क्रीडा, साहित्य स्पर्धा, इन्स्पायर अवार्ड, कृती संशोधन इ.
स्वतःच्या वर्गाचा पालक मेळावासन २०२५-२६ मध्ये १ असल्यास
विविध सामाजिक उपक्रमात सहभागरक्तदान, सिडबँक, पर्यावरण संरक्षण, जनगणना, बी.एल.ओ. निवडणूक, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन इ.
स्नेह संमेलन सहभागसन २०२५-२६ मध्ये
जीवन कौशल्य विकसन उपक्रमनाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असल्यास
शैक्षणिक अभ्यास सहलशाळेच्या सहलीत विद्यार्थ्यांसह स्वतः सहभागी
क्षेत्रभेटी, शिवारफेरी, वनभोजनआयोजन व विद्यार्थ्यांसह स्वतः सहभागी
एकूण गुण९०

वरील निकषांनुसार पडताळणी व छाननी करून शिक्षकांची अंतिम निवड करताना शिक्षकांचा शैक्षणिक, सामाजिक दर्जा, तसेच सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरणाबाबत संवेदनशीलता व त्यासाठी केलेले विशेष प्रयत्न, राष्ट्रीय दृष्टिकोनाबाबत विचार, कार्य व उपक्रम निवड समिती विचारात घेईल व त्यासाठी अतिरिक्त विशेष गुणदान केले जाईल.

वैयक्तिक कौशल्य विकास

स्वतःची कौशल्ये सुधारण्यासाठी वैयक्तिकरित्या केलेले प्रयत्न

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान

आनंददायी शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर

मार्गदर्शक भूमिका

इतर शिक्षकांसाठी मार्गदर्शक म्हणून काम

सामाजिक संवेदनशीलता

पोषण, स्वच्छता, बालविवाह, वंचित मुलांचे उत्थान याबाबत जागरूकता निर्माण करणारे कार्य

९०

वरील २० हून अधिक निकषांवर आधारित गुणदान.

३०

सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण संवेदनशीलता व शैक्षणिक दृष्टिकोनासाठी राखीव गुण.

८०

ऑनलाईन प्रोफाइल लिंकवर प्राप्त मतांच्या पर्सेंटाइल फॉर्म्युलानुसार गुणदान.

मान्यताप्राप्त खाजगी शाळांतील शिक्षकांना वरीलपैकी काही निकष लागू होतीलच असे नाही — अशा शिक्षकांनी निकषांशी साधर्म्य असलेले जे योगदान शैक्षणिक कार्यात दिले असेल त्याची माहिती प्रस्तावात नमूद करावी. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.

पुढे वाचा

पुढील पायरी

आपल्या कार्याचा सन्मान होण्याची वेळ आली आहे

राज्यातील शेकडो शिक्षकांप्रमाणे आपणही आपले नामनिर्देशन प्रस्ताव आजच दाखल करा.

नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करा
संपर्क

आमच्याशी संपर्क साधा

हेल्पलाईन
9325005833, 9226646474, 7058397976
व्हॉट्सअ‍ॅप
9325005833
कार्यक्रम स्थळ
बँक्वेट हॉल, नांदूर नाका, नाशिक
वेबसाईट
www.shikshakpuraskar.com

आपला प्रश्न पाठवा