आजचे विद्यार्थी घडवणाऱ्या, राज्यभरातील गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांच्या निष्ठापूर्वक कार्याचा गौरव. राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर सन्मान — शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, ट्रॉफी व विशेष भेटवस्तूंसह.
शिक्षण हा समाजाच्या विकासाचा मजबूत पाया आहे. शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे महत्त्वाचे काम करत असतात — संस्कार, ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन देऊन ते देशाचे आदर्श नागरिक घडवतात.
इतर व्यवसायांत निवृत्तीनंतर व्यक्ती "माजी" ठरतात, पण शिक्षक आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या मनात "माझे शिक्षक" म्हणूनच राहतात. अनेक गुणवंत व मेहनती शिक्षक मात्र पुरस्कारांपासून वंचित राहतात व त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचत नाही — याच पोकळीसाठी अॅस्पायर फाउंडेशनने हा उपक्रम सुरू केला आहे.
"माझे शिक्षक" — निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांच्या मनात कायम राहणारी ओळख.
अॅस्पायर फाउंडेशन ही राज्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक नोंदणीकृत सेवाभावी संस्था (एन.जी.ओ.) आहे. संस्थेला ISO 9001:2015 मानांकन प्राप्त आहे, तसेच भारत सरकारच्या नीती आयोगाचीही मान्यता संस्थेला प्राप्त आहे. संबंधित सर्व कागदपत्रे अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
आपल्या उपक्रमशील कार्याची माहिती वेबसाईट, सोशल मीडिया व वर्तमानपत्रातून समाजापर्यंत पोहोचते.
सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, राष्ट्रीय/राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांची समिती छाननी करते.
प्रत्येक स्तरावरील गुणवंत शिक्षकाला संधी — तळागाळातील शिक्षकही वंचित राहणार नाही.
निवड न झालेल्या सर्व सहभागी शिक्षकांनाही सोहळ्यात मंचावर शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येते.
संपूर्ण राज्यातून १०० शिक्षकांची निवड
शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, ट्रॉफी व लॅपटॉप
प्रत्येक जिल्ह्यातून दहा शिक्षकाची निवड
शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, ट्रॉफी व टॅब
प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड
शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व ट्रॉफी
नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करणाऱ्या इतर सर्व सहभागी शिक्षकांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मान
सहभागनामनिर्देशन प्रस्ताव दाखल केलेल्या उर्वरित सर्व सहभागी शिक्षकांनाही पुरस्कार सोहळ्यात मंचावर मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
तज्ञ समितीमार्फत निवडक शाळांना पुरस्कार सोहळ्याच्या मंचावरून एल.ई.डी. स्क्रीन भेट म्हणून दिली जाईल.
उर्वरित सर्व सहभागी शिक्षकांना सोहळ्यात आमंत्रित करून शाल, श्रीफळ व सन्मानपत्र दिले जाईल.
शिक्षकांच्या कार्याचे मूल्यमापन तीन भागांत केले जाते — यामुळे प्रक्रिया वस्तुनिष्ठ व पारदर्शक राहते.
शैक्षणिक अर्हता, अध्ययन निष्पत्ती, संशोधन, सामाजिक कार्य, ग्रंथलेखन, ऑनलाईन उपक्रम सहभाग इ. २० हून अधिक निकषांवर आधारित गुणदान.
सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण संवेदनशीलता, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापर व शैक्षणिक दृष्टिकोन यासाठी राखीव गुण.
ऑनलाईन प्रोफाइल लिंकवर प्राप्त मतांच्या पर्सेंटाइल फॉर्म्युलानुसार गुणदान.
निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. प्राथमिक निवड झालेल्या शिक्षकांची माहिती संबंधित शाळेशी संपर्क करून पडताळली जाईल, त्यानंतरच अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
आलेल्या सर्व प्रस्तावांची छाननी व शिक्षकांची निवड पारदर्शक पद्धतीने केली जाते. सर्व प्रस्तावांची डिजिटल नोंद एक वर्षासाठी जतन करून ठेवली जाते.
नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच राज्य किंवा केंद्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी कृपया या पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करू नयेत — जेणेकरून अद्याप संधी न मिळालेल्या गुणवंत शिक्षकांना वाव मिळेल. असे शिक्षक दूरध्वनी किंवा ई-मेलद्वारे संस्थेला मार्गदर्शन करू शकतात.
| सदस्य | संख्या | पदनाम |
|---|---|---|
| सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी | एक | अध्यक्ष |
| राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक / मुख्याध्यापक | चार | सदस्य |
| शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती | पाच | सदस्य |
| अॅस्पायर फाउंडेशन कर्मचारी | पंधरा | तांत्रिक सहाय्यक |
शिक्षकांनी सादर केलेले पुरावे स्वयंसाक्षांकित करणे आवश्यक आहे. अॅस्पायर फाउंडेशन ही संस्था शासनाशी संलग्न नसल्याने पुरावे मुख्याध्यापक/गटशिक्षणअधिकारी/प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करण्याची आवश्यकता नाही — परंतु दिलेली माहिती व पुरावे चुकीचे अथवा दिशाभूल करणारे नसावेत.
खालील वेळापत्रकात अनपेक्षित बदल झाल्यास सर्व नामनिर्देशित शिक्षकांना ई-मेल व व्हॉट्सअॅपद्वारे सूचित केले जाईल.
खाते नाव: Aspire Foundation
खाते क्रमांक: 0610102000017329
IFSC कोड: IBKL0000103
शाखा: नाशिक मेन ब्रांच
खालील फॉर्म भरून आपला प्राथमिक तपशील नोंदवा. आमचे समन्वयक आपल्याशी पुढील प्रक्रियेसाठी संपर्क साधतील.
आपण करत असलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे फोटो आणि व्हिडिओ
विद्यार्थी व शिक्षकांना प्राप्त पुरस्कारांचे फोटो
वृत्तपत्र/नियतकालिकातील लेख अथवा संशोधनपर निबंध
शाळानिहाय सेवा कालावधीचा तपशील
टीप: प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने दाखल करत असल्यास स्वतंत्र ऑफलाईन अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.
पुरस्काराचे निकष, गुणदान पद्धत व विहित नमुना अर्जासह संपूर्ण माहिती PDF स्वरूपात मिळवा.
माहितीपत्रक डाउनलोड कराराज्यातील शेकडो शिक्षकांप्रमाणे आपणही आपले नामनिर्देशन प्रस्ताव आजच दाखल करा.
नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करा